कार्यकर्त्यांवरही भरारी पथकांचा वॅाच

0

रत्नागिरी : सर्वसामान्य मतदाराला भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारच आमिष, प्रलोभन दाखवणे राजकीय पक्ष किंवा त्यांच्या उमेदवारांना महागात पडू शकते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकत्यांना रात्री दहा वाजण्यापूर्वी प्रचार आटोपावा लागणार आहे. हॉटेल्स, ढाबे बंद ठेवावे लागणार आहे. लपून-छपून चालणाऱ्या जेवणावळींवर प्रशानाने तैनात केलेल्या भरारी पथकांचा बाँच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून सुरू असलेल्या मोर्चेबांधणीमुळे वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. आचारसंहिता काळात जरी प्रचार करता येत असला तरीही आचारसंहितेमध्ये नागरिकांचाही विचार करण्यात आला आहे. कोणताही प्रचार रात्री १० च्या आतच संपवणे, थांबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. रात्रीचा प्रचार न थांबल्यास संबंधित उमेदवार किंवा पक्षाला कारवाईला समोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात रात्रीच्यावेळी हॉटेल्स बंद राहणार असल्याने जेवणावळीना पायबंद बसणार आहे. मात्र, काही उमेदवारांकडून प्रशासनाला गुंगारा देऊन प्रचार करणाच्या कार्यकत्यासाठी किंवा मतदारांसाठी मंगल कार्यालये, शाळा-महाविद्यालयांच्या इमारती, शहराबाहेर आडोशाला असणारे ढाबे, हॉटेल्सवर जेवणाचे बेत ठेवले जातात. हे कृत्यसुध्दा आचारसंहितेचे उल्लंघन ठरू शकते. विधानसभा निवडणुकीत या सर्व ठिकाणांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांपैकी कुणाकडून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी अलर्ट रहावे लागणार आहे. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स, कटआऊट, होर्डिंग्ज रस्त्याच्या बाजूला, चौका-चौकात, इमारतींवर, सरकारी कार्यालयांवर राजरोसपणे लावली जातात. असे फलक लावण्यासाठी आयोगाने नियम बनवले आहेत. नागरिकांच्या खासगी इमारतीचा, मालमत्तेचा अथवा जमिनीचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही पक्षाला करता येत नाही. तसेच कोणत्याही पक्षाला त्याच्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रचार सभांमध्ये, मिरवणुकांमध्ये, भाषणांमध्ये कसल्याच प्रकारचा अडथळा आणण्याचा अधिकार नाही. एकाच दिवशी संबंधित पक्षांच्या सभा असतील तर त्यांच्या बेळा बदलून द्याव्या लागणार आहेत. तरीही एकमेकांच्या सभांमध्ये कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे परवानग्या प्रशासनाकडून घ्याव्या लागणार आहे.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here