वादळ नुकसानीच्या भरपाई पोटीचा ४० कोटींचा निधी माघारी

0

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळासह इतर नैसर्गिक नुकसानासाठी शासनाने एकूण १७३ कोटी७६ हजार ९८ हजार एवढा निधी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र, हा निधी विविध लेखाशीषार्खाली असल्याने अन्य दुसऱ्या लेखाशीषार्साठी वापरता येत नसल्याने यापैकी उरलेला ४० कोटी निधी परत पाठविला गेला. वर्षी जिल्ह्यात कोरोनाचे संकट असताना ३ जून रोजी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका पावसाळ्याच्या सुरूवातीलाच किनाऱ्यालगत असलेल्या तालुक्यांना बसला. २००८ साली झालेल्या फयान चक्री वादळानंतर २०२० साली निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला झोडपून काढले. केवळ दोन अडीच तास सुरू असलेल्या या चक्रीवादळाने दापोली, मंडणगड, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या तालुक्यांमधील किनाऱ्यांवर वसलेल्या गावांना चांगलाच तडाखा दिला. यावर्षीच्या पावसाळ्यातील ही सर्वात मोठी नुकसानाची घटना होती. या वादळात हजारो घरे आणि झाडे उन्मळून पडली. खासगी मालमत्तांबरोबरच सार्वजनिक मालमत्तांचेही नुकसान केले. घरे, गोठे, झाडे यांच्याबरोबरच शाळा, कार्यालये आदी इतरही सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले. यात सर्वाधिक फटका महावितरणच्या सेवेला बसला. या कार्यालयाचे सुमारे १८ कोटींचे नुकसान झाले. मात्र, या नुकसानासाठी शासनाकडून विविध लेखाशीषार्खाली तातडीने ४५ लाख रूपयांची मदत करण्यात आली. यातून जखमी, मृत व्यक्तींना सहाय, भांडी कपडे सानुग्रह अनुदान, स्थलांतरीत केलेल्या व्यक्तींसाठी निधी देण्यात आला. निधीतून नुकसानाचे पंचनामे करून बहुतांश लोकांना भरपाईची रक्कम तातडीने दिली गेली.
त्यानंतरही दुसऱ्या टप्प्यात शासनाकडून जिल्हा प्रशासनाला विविध लेखाशीषार्खाली आठवडाभरात २६ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी देण्यात आला. तिसऱ्या आठवड्यात पुन्हा जखमी, मृत व्यक्तींना सहाय, भांडी कपडे सानुग्रह अनुदान, स्थलांतरित केलेल्या व्यक्तींसाठी मदत, पशुधनासाठी सहाय, दुकानटपरी, शेती, घरे, गोठे, आदींसाठी ८९ कोटी ८८ लाख ६९ हजार एवढा निधी प्राप्त झाला आणि शेवटच्या टप्प्यात पुन्हा ५६ कोटी, ७८ लाख ९८ हजार एवढा निधी पुन्हा घरे, गोठे यांचे नुकसान तसेच मत्स्य व्यवसायासाठी सहाय्य यासाठी शासनाकडून देण्यात आला. यापैकी निसर्ग वादळातील नुकसानासाठी आलेल्या जून महिन्यात आलेल्या ११६ कोटी निधीचे वाटप वादळाचा फटका बसलेल्या गावांमधील घरे, गोठे यांच्या उभारणीसाठी तातडीने करणायत आले.

या वादळामुळे दापोली, मंडणगड, या तालुक्यांतील ६२८ गावांमधील ४ लाख १४ हजार ६९४ लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला. कोविड-१९ रुग्णांवर उपचार करणारी सहा हॉस्पिटल्स, १२२१ सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व ३२७ मोबाईल टॉवर्सचा यांचाही वीज पुरवठा खंडित झाला होता. हजारो विद्युत खांब कोसळले, झाडे कोसळून पडली तर हजारो घरे, गोठे उद्ध्वस्त झाले होते. निसर्ग वादळाने कोकणातील रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील किनाऱ्यालगत असलेल्या गावांची अपरिमित हानी केली. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेत नुकसानाच्या भरपाईचा अध्यादेश काढून या जिल्ह्यांना निधी दिला. त्यामुळे निसर्ग वादळाने नुकसाने केलेल्या लोकांची घरे उभारण्यास मदत झाली. अजूनही शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची गरज असल्याने जिल्हा प्रशासनाने २८ कोटींची मागणी वेगळ्या लेखाशीषार्खाली केली आहे. पहिल्या टप्प्यात ४५ लाख रूपयांचा निधी आला. यापैकी जखमी-मृत व्यक्तींना सहाय्य, भांडी, कपडे सानुग्रह आदींसाठी २० लाख रुपए, मदत छावणीमधील व्यक्तींसाठी पाच लाख तर कचरा-ढिगारे उचलण्यासाठी२० लाख रुपए अनुदान मिळाले. दुसऱ्या टप्प्यात २६ कोटी६५ लाख रूपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात आले. यापैकी ३ कोटी ५० लाख जखमी-मृत व्यक्तींना सहाय, ३ कोटी ५० लाख भांडी, कपडे सानुग्रह, १० कोटी घर, गोठे, ६ कोटी७५ लाख शेती नुकसान, १० लाख छावणीमधील व्यक्तींसाठी मदत, १ कोटी कचरा उचलण्यासाठी तर ५० लाख दुकान टपरी तसेच पशुधन नुकसानासाठी देण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात आलेल्या ८९ कोटी ८८लाख ६९ हजारपैकी शेतीसाठी १५ कोटी, ७५ कोटी घर, गोठे नुकसानासाठी, ६ लाख पशुधनासाठी सहाय्य तर २४ लाख दुकान, टपरी नुकसान तसेच १६ लाख ६९ हजार मत्स्यव्यवसायासाठी देण्यात आले. शेवटच्या टप्प्यात ५६ कोटी७८ लाख २९ हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. यापी ५६ कोटी २८ लाख रुपए घर, गोठे नुकसानासाठी तर ५० लाख २९ हजार मत्स्यव्यवसाय साठी मंजूर झाला होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here