म्हाप्रळ-आंबेत रो-रो सेवेला नागरिकांचा प्रतिसाद

0

मंडणगड : तालुक्यातील आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने हा पूल दि. १० फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून म्हाप्रळ-आंबेत रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आंबेत ते म्हाप्रळ या सुमारे २०० ते ३०० मीटरच्या प्रवासाकरिता प्रवाशांना तासाभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. पर्यटकांचा वाढता ओघ पाहता आणि एका बोटीवर भार येत असल्याने रो-रो व्यवस्थापनाने आणखी एक बोट वाहतुकीसाठी आणली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 15-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here