सरकार आयकर स्लॅबच्या दरात बदल करणार

0

नवी दिल्ली : केंद्र सरकाने कॉर्पोरेट कर कमी करून कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा दिला आहे. आता सरकार व्यक्तीगत आयकर नियम बदलून मध्यमवर्गालाही फायदा देण्याचा विचार करत आहे. मध्यम वर्गाचे खर्च करण्यायोग्य उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार वैयक्तिक आयकर दर तर्कसंगत करण्याचा विचार करीत आहे. यात विविध स्लॅबचे आयकर दरात बदल करण्याचा विचार केला जात आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सराकार कॉर्पोरेट कर कमी करण्याचे पाऊल गुंतवणुकीची भावना वाढावी आणि तसेच भारतीय उद्योगांना सक्षम करण्यासाठी उचलले आहेे. याचबरोबर सरकारी अधिकारी प्रत्यक्ष कर रचनेत बदल करुन ते सहज सोपे करण्यासाठी काम करत आहेत. ते आपला अहवाल 19 ऑगस्टला सादर केला होता. सरकार कर स्लॅब दरात बदल करणार आहे त्यात 5 ते 10 लाख उत्पन्न असलेल्यांसाठी आधीचा 20 टक्के कर बदलून 10 टक्के करण्याची शक्यता आहे. तर 10 ते 20 लाख उत्पन्न असलेल्यांसाठी 20 टक्के कर लावण्याची शक्यता आहे. तसेच 20 लाख ते 2 कोटी उत्पन्न असलेल्यांना 30 टक्के आणि त्याच्या वर उत्पन्न असलेल्यांना 35 टक्के आयकर द्यावा लागण्याची शक्यता आहे.  

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here