लांजा येथील उरूस कोरोनामुळे रद्द

0

लांजा : तालुक्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सय्यद चाँदशहा बुखारी दर्गा लांजा यांचा उरूस या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती दर्गा व्यवस्थापक कमिटीतर्फे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. दक्षता म्हणून आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरूस रद्दचा निर्णय चाँदशहा बुखारी बाबा दर्गा कमिटी आणि मानकरी यांनी बैठकीत हा निर्णय घेतला. उरूस २६ फेब्रुवारीला होणार आहे. हा उरूस २४, २५ व २६ फेब्रुवारी असा तीन दिवस साजरा होणार होता. परंतु, कोरोनामुळे या वर्षी रद्द केला असून, धार्मिक विधी पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत होतील. भाविकांनी दर्शनासाठी किंवा नैवैद्यासाठी एकत्रित जमू नये, असे आवाहन चाँदशहा दर्गाचे मानकरी आणि दर्गा कमिटीने केले आहे

त्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 16-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here