नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. मंगळवारी सकाळी भागवत हे मिथुन चक्रवर्तींना भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत. पश्चिम बंगालमध्ये येत्या काही काळात निवडणुका असल्याने या निवडणुकीआधी मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या खास भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या भेटीमुळे चक्रवर्ती यांचा भाजपा प्रवेशाच्या चर्चेला देखील पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 16-Feb-21