महात्मा गांधींची आज १५०वी जयंती; पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली

0

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या, जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या, सत्याग्रहाच्या मार्गानं बलाढ्य शत्रूला नमवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज १५० वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींना आदरांजली वाहून त्यांच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर विजयघाटला जाऊन त्यांनी लालबहादूर शास्त्रींच्या स्मृतींना अभिवादन केले. आज लालबहादूर शास्त्रींची ११५ वी जयंती आहे. यानंतर पंतप्रधान संसदेत जातील. तिथे दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना वंदन करतील. यानंतर मोदी साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी अहमदाबादला रवाना होतील. २०१४ मध्ये २ ऑक्टोबरला मोदींना स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. याच अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आज मोदी सहभागी होतील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here