पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना मास्क न वापरल्याने दंड

0

पालघर : कोरोना चा प्रसार होऊन नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे हे महत्त्वाचं आहे. सरकारकडून यासाठी वारंवार जनतेला आवाहन केलं जातं. मात्र नो मास्क, नो एन्ट्री या राज्य सरकारच्या धोरणाचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे शिवसेनेचे पदाधिकारीच उल्लंघन करत असल्याचे पालघरमध्ये समोर आलं आहे. मास्क घातला नाही म्हणून पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांना दंड भरावा लागला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात सतर्कतेचे संकेत दिले आहेत.

पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात एका विषयावर चर्चा करण्यासाठी अध्यक्षा भारती कामडी यांनी सकाळी 11 वाजताच्या सुमारास प्रवेश घेतला. जिल्हाधिकारी यांच्या समोर बसल्या असताना त्यांच्याकडे मास्क नसल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता आपण मास्क घालायला विसरल्याची त्यांनी कबुली दिली. राज्य शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणे गुन्हा असल्याने त्यांच्यावर 200 रुपयाची दंडात्मक कारवाई करून त्यांना एक नवीन मास्क देण्यात आला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मास्क घालण्याबाबत सक्ती केली जात असून त्याचे अनुकरण जिल्ह्यात इतर ठिकाणी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:34 PM 16-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here