इंग्लंडला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रॅकिंगमध्ये टीम इंडियाची मोठी झेप

0

चेन्नई : दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 317 धावांच्या मोठ्या फरकाने टीम इंडियाने पराभव केला. यासह टीम इंडियाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाला या विजयाचा दुहेरी फायदा झाला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली. तर मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या रॅकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 च्या रॅकिंगमध्ये टीम इंडियाने मोठी झेप घेतली आहे. भारताला या मोठ्या अंतराने विजय मिळवल्याने 2 स्थानांचा फायदा झाला आहे. टीम इंडियाने यासह चौथ्या क्रमांकावरुन थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर इंग्लंडला या पराभवामुळे मोठा धक्का लागला आहे. दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर इंग्लंडची घसरण झाली आहे. एकूणच या सामन्याच्या निकालामुळे टीम इंडियाला फायदा तर इंग्लंडला तोटा झाला आहे. दरम्यान या फेरबदलामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्साठीची चुरस आणखी रंगतदार झाली आहे. न्यूझीलंडने आधीच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी एकाच संघाला संधी आहे. तर स्पर्धेत टीम इंडिया, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया असल्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात कोण खेळणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:42 PM 16-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here