जिल्ह्यात 22 तीव्र कुपोषित बालके

0

रत्नागिरी : जिल्ह्यात 22 तिव्र कुपोषित (सॅम) बालके असून त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बाल विकास केंद्र (व्हीसीडीसी) सुरु केली आहेत. निधी अभावी या कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरवण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर त्या सेविकांना झालेला खर्च देण्यात येणार आहे.

कोरोनातील टाळेबंदीमुळे विविध योजनांसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्या योजना राबविताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. त्याचा फटका महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणार्‍या कुपोषित बालकांच्या पोषण आहार योजनेला बसलेला आहे. गेल्या वर्षभरात 0 ते 6 वयोगटातील 81 हजार 801 मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातील 74 हजार 33 मुले सर्वसाधारण वजनाची होती. 718 कमी वजनाची आणि मध्यम वजनाची 6 हजार 388 मुले आहेत. मध्यम कुपोषित बालकांची संख्या 457 असून तिव्र कुपोषीत बालकांचा आकडा 22 आहे. सर्वाधिक बालके गुहागर तालुक्यात असून लांजा व संगमेश्‍व तालुक्यात तिव्र कुपोषित बालके नाहीत. कोरोना काळ असुनही कुपोषित बालकांची शोध मोहीम थांबवण्यिात आलेली नव्हती. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषित बालकांवर लक्ष ठेवण्यात आलेेले होते. तिव्र कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार शासनाकडून दिला जातो. त्या बालकांसाठी व्हीसीडीसी केंद्र उभारण्यात आलेली आहेत. शासनाकडून एका केंद्रासाठी 1500 रुपये दिले जातात. त्यात 900 रुपये पोषण आहारासाठी आणि उर्वरित सहाशे रुपये औषधे, अंगणवाडी सेविकांचा खर्च यावर केला जातो. यंदा कोरोनामुळे हा निधीच आलेला नाही. त्यामुळे व्हीसीडीसी केंद्रांवरुन पोषण आहार द्यायचा कसा हा प्रश्‍न निर्माण झाला होता; मात्र प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना गावपातळीवर नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जो खर्च होईल तो, निधी आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कमी वजनाच्या बालकांची संख्या अधिक आहे. त्यांना अतिरिक्त पोषण आहार दिला जात नाही; मात्र त्यांच्यावर वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत तपासणी करुन पालकांना योग्य सुचना दिल्या जात आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here