तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल देवरूख शहरातील ७१ दुकानदारांवर कारवाई

0

देवरूख : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व अन्‍न व औषध प्रशासन विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्‍त भरारी पथकाने मंगळवारी सायंकाळी देवरुखातील दुकानांवर छापे टाकले. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल तपासणीअंती 71 दुकानदारांवर 14 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकाने देवरुखात मंगळवारी सायंकाळी अचानक छापा टाकत दुकानदारांची झडती घेण्यास सुरूवात केली. दुकानांची तपासणी करत असताना काही दुकानदार दोषी आढळले.खाद्य पदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल, शाळेपासून 100 मीटर अंतराच्या आतमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याप्रकरणी व 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल 71 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे दुकानदारांचे धाबे दणाणले. ही कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. शैलेश गावंडे, अन्न व प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे, प्रशांत गुंजाळ, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे यांनी केली. यावेळी देवरुख बीट अंमलदार हे. कॉ. दिपक पवार, पोलीस नाईक संतोष सडकर व होमगार्ड अधिकारी संजय टक्के उपस्थित होते. 

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here