बेकायदा गावठी दारू बाळगल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षे सक्तमजुरी

0

रत्नागिरी : तालुक्यातील टिके येथे बेकायदा गावठी हातभट्टीची १० लिटर दारु बाळगल्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने मंगळवारी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही कारवाई ९ मार्च २०१७ रोजी सायंकाळी ४ वा.सुमारास ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली होती. राजेंद्र ज्ञानेश्वर सुर्वे (४२, रा. बागपाटोळे, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल विजयकुमार गुंडप्पा चावरे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, राजेंद्र हा टिके येथे गावठी हातभट्टीची १० लिटर दारु विक्रीसाठी आपल्याकडे बाळगत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती. त्या आधारे ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी राजेंद्रवर मुंबई दारुबंदी कायदा ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर आणि अॅड. जोग यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मंगळवारी या खटल्याचा निकाल देताना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी क्र.२ यांनी राजेंद्र सुर्वे याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here