नाचणेतील नाईट अंडरआर्म चषकावर ऑल मिरकरवाडा संघाची बाजी

0

रत्नागिरी : रत्नागिरीत शहरानजिकच्या नाचणे येथील नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ऑल मिरकरवाडा संघाने बाजी मारली. तर जय भैरी सोमेश्वर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाचणे येथील श्री गणेश क्रिकेट क्लब यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. नाचणे येथील नाईट अंडरआर्म स्पर्धचा उदघाटन सोहळा युवा उद्योजक अमोल सावंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष आबा घोसाळे, ग्रा. प. सदस्य शुभम सावंत, सुनील रसाळ उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम सामना ऑल मिरकरवाडा विरुद्ध जय भैरी सोमेश्वर या संघांमध्ये झाला. सामन्यात ऑल मिरकरवाडा संघ विजयी ठरला. या संघाला रोख 7 हजार 999 व कै. जयप्रकाश उर्फ जयु सावंत स्मरणार्थ चषक देऊन प्रतीक जयप्रकाश सावंत यांच्याहस्ते गौरविण्यात आले. तर उपविजेता जय भैरी संघाला राहुल प्रदीप सावंत यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल गणेश क्रिकेट क्लबचे राजा देसाई यांचे प्रतिक सावंत यांनी आभार मानले. या स्पर्धेला प्रतीक जयप्रकाश सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रतिक सावंत इंग्लड येथे स्पोर्ट मॅनेजमेंट मास्टर्सचे दोन वर्षे शिक्षण घेऊन ते रत्नगिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरीत खेळाचा दर्जा उंच व्हावा यासाठी त्यानी काम सुरू केले आहे. इंग्लड मध्ये क्रीडा विषयक घेतलेल्या अभ्यासाचा रत्नागिरीतील क्रीडापट्टूना फायदा व्हावा यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहे. रत्नागिरीतील खेळातील टॅलेंट राज्य आणि देश पातळीपर्यंत जावे हा प्रतीक सावंत यांचा मानस आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:36 PM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here