जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे अयोध्देतील श्री राम मंदिरासाठी २ कोटी ५३ लाख

0

नाणीज : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने अयोध्देतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी २,५३,२४,१५२ रुपयांचा निधी दिला. सेवा कार्यात सतत आघाडीवर असलेल्या जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी हा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्याकडे टाळ्यांच्या प्रचंड गजरात सुपूर्द केला.

दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना महामाही अशा सर्व नैसर्गिक आपत्तीवेळी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने मोठी केली आहे. यावेळी आयोध्देतील श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी २,५३,२४,१५२ रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संस्थानच्या इतिहासातील हा महत्वाचा दिवस आहे. यावेळी संस्थानच्या कार्याचा गौरव करताना श्री देवगिरीजी महाराज म्हणाले,” मी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक कार्य पाहून तृप्त झालो आहे. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रउभारणीचे काम करीत आहे. संस्थानने दिलेला हा निधीरुपी प्रसाद सत्कारणी लागेल. जगद्गुरू महाराजांचे हिंदूधर्म पुनर्रप्रवेशाचे कार्य मोठे आहे. असे दूर दृष्टीने महाराज या भूमिला लाभले आहेत. त्यांचे काम दिव्य आहे.” यावेळी संस्थानच्या कार्याचा गौरव करताना श्री देवगिरीजी महाराज म्हणाले,” मी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक कार्य पाहून तृप्त झालो आहे. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रउभारणीचे काम करीत आहे. संस्थानने दिलेला हा निधीरुपी प्रसाद सत्कारणी लागेल. जगद्गुरू महाराजांचे हिंदूधर्म पुनर्रप्रवेशाचे कार्य मोठे आहे. असे दूर दृष्टीने महाराज या भूमिला लाभले आहेत. त्यांचे काम दिव्य आहे.” जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यावेळी म्हणाले,” श्री राम मंदिर उभारणीच्या निमित्ताने जातीपाती बाजूला ठेवून सर्व हिंदूनी एकत्र येऊन राष्ट्रउभारणीचे काम करूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद सतत साधूसंतांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. यातून हिंदू धर्म विश्वधर्म होईल. समाजाची सेवा ही खऱ्या अर्थाने साधूसंतानीच करायची आहे.” सुरूवातीला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पूज्यनीय गोविंद देवगिरीजी महाराजांचा जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परीषदेच्या गोवा महाराष्ट्रचे क्षेत्रीय मंत्री श्री शंकरजी गायकर, श्रीपाद जोशी, दैनिक रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर यांनी यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा व संस्थानच्या सेवाकार्याचा गौरव केला. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री विनायकजी देशपांडे यांच्या हस्ते प्रवीण सावंत (पाली), प्रमोद खटखूळ (नाणीज), मनोज सुर्वे (पाली) या स्थानिक कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वहिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी, प्रांत व जिल्हा अभियान प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात श्रीपादजी जोशी, अनिरुद्धजी पंडीत, मोहनराव भावे, विवस्वान हेबाळकर, जयंतराव देसाई, मुन्नाशेट सुर्वे, आनंद मराठे, सौ. उमाताई देवळे, उदय चितळे, सतीश घोटगे आदींचा समावेश होता. यावेळी संस्थानच्या सर्व विश्वस्तांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी प.पू. कानिफनाथ महाराज यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद भागवत यांनी केले. अयोध्देत श्री राम मंदिर झालेच पाहिजे अशी भूमिका जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सुरूवातीपासून घेतली होती. गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड उतराखंड आदी राज्यांत त्यांचे जे दौरे होत असत, त्यामध्ये त्यांच्या दोन भूमिका महत्वाच्या होत्या त्या म्हणजे एक हिंदुत्व जागरण व दुसरे श्री राम मंदिराची उभारणी. याशिवाय त्यांनी सर्व धार्मिक व अध्यात्मिक व्यासपीठावरही सतत हीच भूमिका मांडली आहे. कुंभमेळ्यातील आखाडापरिषदेत त्यांनी याच भूमिकेचा पुनरूच्चार केला होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:43 PM 17-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here