पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात होणार दहा प्रचारसभा

0

मुंबई : निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राज्यात जोरदार प्रचाराची रणनीती भाजपने आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, योगी अदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. अन्य राज्यातूनही बड्या नेत्यांची मोठी फौज राज्यात प्रचारासाठी उतरणार आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी 21 तारखेला एकाचवेळी मतदान होणार आहे. येत्या 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर भाजपचा राज्यभर प्रचाराचा धडाका सुरु होणार आहे. कश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयावरुन भाजपने राज्यभर सभा घेऊन निवडणुकीपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती. अमित शहा यांनी यानिमित्ताने मुंबईत मेळावा घेतला.  मोदी राज्यात 10 जाहीर सभा घेणार आहेत. तर, अमित शहा यांच्या 20 ठीकाणी सभा होणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील सुमारे 100 मतदारसंघात सभा होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, केद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे  मुंबईतील उत्तर भारतीय बहुल परिसरात सभा घेणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here