आयपीएलचा लिलाव होणार 19 डिसेंबरला

0

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या पुढील सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव पहिल्यांदा कोलकाता येथे 19 डिसेंबरला होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे हे होम ग्राऊंड आहे. आतापर्यंत अनेकवेळा खेळाडूंचा लिलाव बंगळुरूला झाला आहे. खेळाडूंची ‘ट्रेडिंग विंडो’ अजूनही खुली आहे. ती 14 नोव्हेंबरला बंद होईल. या दरम्यान संघ आपल्या खेळाडूंच्या अदलाबदलीसह आपल्या खेळाडूंना दुसर्‍या संघाला विकू शकते. फ्रेंचायझींना याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला आयपीएल 2019 च्या लिलावाकरिता 82 कोटी देण्यात आले होते. तर, 2020 च्या सत्रासाठी ही रक्‍कम 85 कोटी करण्यात आली आहे. प्रत्येक फ्रेंचायझीकडे तीन कोटी अतिरिक्‍त रकमेसोबत गेल्या सत्रातील शिल्लक राशीदेखील असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सर्वाधिक 8 कोटी 20 लाख रुपये इतकी रक्‍कम शिल्लक आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघाकडे 7 कोटी 15 लाख रुपये आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 6 कोटी 5 लाख रुपये घेऊन मैदानात उतरेल. पुढील वर्षी फ्रेंचायझी भंग होण्यापूर्वी या वर्षीचा हा शेवटचा लिलाव असणार आहे. यानंतर 2021 मध्ये संघांसाठी नवीन लिलाव होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here