जमावबंदीच्या आदेशांमुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकूब

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच आज महासभा तहकूब करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आजची महासभा कामकाज सुरु होण्यापूर्वीच महापौर सतीश कुलकर्णी यांनी तहकूब करण्याची घोषणा केली. महापालिकेची महासभा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार असल्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र, तद्नंतर जे सदस्य सभागृहात येतील त्यांच्यासमवेत महासभा घेतली जाईल असे ठरविण्यात आले होते. दरम्यान, जवळपास २० नगरसेवक आज या महासभेला हजार झाले होते. यानंतर महासभा सुरु होण्याची वेळ झाली. महापौरांनी सभागृहात प्रवेश केला आणि लगेचच नाशिक मनपा क्षेत्रात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आजची महासभा कुठलेही कामकाज न पार पडताच तहकूब करण्यात आल्याचे महापौर कुलकर्णी यांनी जाहीर केले. सभागृहात चर्चा करण्यासाठी आलेल्या नगरसेवक आणि गटनेत्यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत सभागृहातून काढता पाय घेतला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 18-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here