मच्छिमारांकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष : चेतन पाटील

0

दापोली : कोकणातील पारंपरिक मच्छीमार समाजाला अनेक समस्या भेडसावत असून, ते मेटाकुटीला आले आहेत. वारंवार येणारी वादळे, त्यातच आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट यामुळे मच्छीमार बांधव त्रस्त झाला आहे. परंतु या मच्छीमार बांधवांकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कोळी महासंघाचे युवक अध्यक्ष ॲड. चेतन पाटील यांनी केला आहे. हर्णै बंदरात कोळी महासंघातर्फे कोळी बांधवांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला कोळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पांडू पावसे, तालुका अध्यक्ष गजानन चौलकर, हर्णै पाजपंढरी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन किसान चौगले, दापोली पंचायत समिती सभापती रऊफ हजवाने, डी. एम. वाघे, माजी सरपंच अस्लम अकबानी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 18-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here