खेड : रिक्षात प्रवासी भाडे घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला दारू पिण्यास अटकाव केल्याच्या कारणातून प्रवाशाने रिक्षा चालकाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी गावानजीक घडली. रवींद्र भागोजी भालेकर असे त्या जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ते आपल्या । ताब्यातील रिक्षामध्ये सुभाष रमेश चव्हाण रा. नाशिक सध्या रा. खेड या प्रवाशाला घेऊन जात होते. मात्र वाटेतच प्रवासी चव्हाण याने दारू पिण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रिक्षा चालक भालेकर याने दारू पिण्यास अटकाव केला. यामुळे याचा राग प्रवासी चव्हाण यास आल्याने त्याने भालेकर यांना मारहाण करत त्यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडून त्यास गंभीर जखमी केले. रात्री उशिरा येथील पोलीस स्थानकात चव्हाण याच्यावर येथील पोलीस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
