रत्नागिरी जैन संघ मध्ये दीक्षा त्रिवेणी

0

रत्नागिरी : श्री सुमतिनाथ भगवान यांच्या असीम कृपेने शहरातील प्रतिथयश उद्योजक कै. शा. रुपचंदजी छोगाजी ओसवाल (नाणेशा) यांचे तीन पणतू संयम मार्ग अनुसरून संसारातील सर्व सुखसोयींचा त्याग करून साधू-साध्वी जीवनाचा प्रवास निरंतर करणार आहेत. संघवी शा. चंदनमल रुपचंदजी ओसवाल (नाणेशा) यांची नात ममक्ष कुमारी विधी दिनेश ओसवाल (नाणेशा- वय २० वर्ष), शा. कांतिलाल रुपचंदजी ओसवाल (नाणेशा) यांची नात मुमुक्षू कुमारी यशिता दिपक ओसवाल (नाणेशा- वय २० वर्ष) आणि शा. घेवरचंद रुपचंदजी ओसवाल (नाणेशा) यांचा नात ममक्ष कमार गौतम भैरूलाल ओसवाल (नाणेशा वय १८ वर्ष) हे तिन्ही बंधू-भगिनी दीक्षाग्रहण करणार आहेत. कुमारी यशिता दि.२१ मार्च २०२१ रोजी श्री कात्रजतीर्थ (पुणे) येथे कुमारी विधी दि.०५ एप्रिल २०२१ रोजी श्री कुंभोजगिरीतीर्थ (कोल्हापूर) येथे आणि कुमार गौतम दि.२४ एप्रिल २०२१ रोजी श्री अंतरीक्षजी महातीर्थ, शिरपूर जैन (वाशीम) येथे साधू-साध्वी जीवनात प्रवेश करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:20 AM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here