बांदकिल्ला येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

रत्नागिरी : तालुक्यातील बांदकिल्ला येथे राहणार्‍या तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार 16 फेब्रुवारी रोजी रोजी दुपारी 3.45 वा.सुमारास घडली. सुहास चंद्रकांत चव्हाण (36, सध्या रा.वसुंधरा बिल्डिंग बांदकिल्ला मुळ रा.मेर्वी भेरेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ मुकेश चंद्रकांत चव्हाण (31, सध्या रा.वसुंधरा बिल्डिंग बांदकिल्ला मुळ रा.मेर्वी भेरेवाडी, रत्नागिरी) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेेबल रेवणे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here