नेत्रावती एक्स्प्रेसचे चारही रेक एलएचबी

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लो. टिळक टर्मिनस – त्रिवेंद्र सेंट्रल या नेत्रावती एक्स्प्रेसलाचारही एलचबीचे रेक उपलब्ध झाले असून आता ही गाडी पूर्णपणे एलएचबी श्रेणीच्या डब्यांसह धावू लागली आहे. मुंबईतील लो. टिळक टर्मिनस ते केरळमधील त्रिवेंद्रम दरम्यान ही गाडी (१६३४५/१६३४६) कोकण रेल्वेमार्गे दररोज धावते. लो. टिळक टर्मिनसहन ही गाडी सकाळी ११ वा. ४० मिनिटांनी सुटून ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी कुडळ, थीवी, करमाळी, मडगाव हे थांबे घेत त्रिवेंद्रमला रवाना होते. ही गाडी चिपळूणला सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी तर रत्नागिरी स्थानकावर ती दररोज सायंकाळी ५ वा. ५० मिनिटांनी येते. त्रिवेंद्रम – लो. टिळक टर्मिनस या मार्गावरील प्रवासात ही गाडी त्रिवेंद्रमहून रोज सकाळी ९.३० मिनिटांनी सुटते. ती रत्नागिरीला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वा. ५० मिनिटांनी तर चिपळूण स्थानकावर ती दुपारी १२ वा. २० मिनिटांनी पोहचते. सायंकाळी पावणे सहा वाजता ही गाडी कुर्त्याला लो. टिळक टर्मिनसला पोहचते. सकाळी कोकणातून निघून सायंकाळी मुंबईत पोहोचता येत असल्याने या गाडीने कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मुंबईतूनही ही गाडी सकाळी निघून खेड, चिपळूण, रत्नागिरीला सायंकाळी पोहोचत असल्याने ही गाडी दक्षिणेतील प्रवाशांप्रमाणेच कोकणवासीय प्रवाशांमध्ये देखील लोकप्रिय आहे. २३ डब्यांची ही रोज कोकण रेल्वेमार्गे धावणारी एक्स्प्रेस गाडी दि. १ मार्च १९९८ पासून धावत आहे. गणेशोत्सवापूर्वी या गाडीला पहिला एलएचबी रेक मिळाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दूरपल्ल्याच्या या गाडीसाठी लागणारे चारही रेक उपलब्ध झाले असन, आता ही गाडी पूर्णपणे एलएचबी श्रेणीच्या कोचसह धावू लागली आहे.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here