पोफळीत हातभट्टीवर छापा; एकास अटक

0

चिपळूण : तालुक्यातील पोफळी सरफरेवाडी येथे शिरगाव पोलिसांनी हातभट्टीवर छापा टाकून एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शामसुंदर शावजी सावंत (५७, रा. पोफळी नाका) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या बाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उत्तम सलाप्पा सासने यांनी दिली आहे. यानुसार, सावंत हे बेकायदा व विनापरवाना हातभट्टीची दारू चोरट्या पद्धतीने विकताना आढळून आले. त्यांच्याकडे १९ लिटर गावठी दारू व साहित्य सापडले आहे. अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here