“रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय”, रायगडावर केलेल्या लायटिंगवरुन उपमुख्यमंत्र्यांचीही नाराजी

0

रायगड : शिवजयंतीनिमित्त रायगडवर करण्यात आलेल्या डिस्को लाईटवरुन वादाला तोंड फुटलं आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आधीच उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नापसंती दर्शवली. ‘रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय. त्यांचा अजाणतेपणा दिसून येतोय. पण महाराजांचा वारसा आहे, तिथं असं घडण चुकीचं आहे’, असं अजित पवार म्हणाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व खात्याकडून परवानगी घेऊन स्वत:च्या निधीतून रोषणाई केली. शिवजयंतीच्या पूर्व संध्येला किल्यावरील अनेक भाग रात्रीच्या अंधारात उजळून निघाले. मात्र आता यावरुन वाद उफाळला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:41 PM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here