अर्जुन तेंडुलकरवर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

0

चेन्नई : यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळाडूंनी कोट्यवधींची उड्डाणं घेतली. किंग्ज इलेव्हन पंजाबने संघातून मुक्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलवर तगडी बोली लागली. विराट कोहलीच्या बंगळुरुने तब्बल 14.25 कोटींची बोली लावून, ग्लेन मॅक्स्वेलला आपल्या ताफ्यात घेतलं. तर दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने आयपीएलच्या हंगामात इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. या लिलावात माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचादेखील समावेश करण्यात आला होता. या लिलावात मुंबई इडियन्सने अर्जुनवर बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने नुकताच मुंबईच्या सीनियर टीममधून (वरीष्ठ संघाकडून) त्याचा टी-20 डेब्यू केला आहे. अर्जुनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हरियाणाविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. याआधी तो 2018 मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळावी, यासाठी अर्जुन प्रयत्न करत राहिला. 21 वर्षीय अर्जुन तेंडुलकर अष्टपैलू खेळाडू आहे. तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघासाठी डेब्यू करणाऱ्या अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:17 PM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here