अखेर चीनने गलवानमधील नामुष्की केली कबूल, मृत सैनिकांची नावेही जाहीर केली

0

बीजिंग : गतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. या तणावादरम्यान, भारतीय लष्कर आणि चिनी सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत. मात्र भारतीय लष्कर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून चिनी सैन्याच्या झालेल्या जीवितहानीबाबत देण्यात येत असलेल्या आकड्यापेक्षा वेगळी आकडेवारी चिनी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. चीनने गलवानमधील झटापटीत आपले चार सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here