इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध असतील तर गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करावी : सुप्रिया सुळे

0

नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक यांनी भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल वक्तव्य केलं होतं. सर्व इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे. इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजपा आमदार गणेश नाईक यांची एसआटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावरुन बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध अससल्याचं जाहीर वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांची एसआटी चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे.” यासाठी अमित शाह यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणार असून संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here