राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचे खेळाडू रवाना

0

रत्नागिरी : रत्नागिरी- शालेय तायक्वांदो स्पर्धेत विभागीय स्तरावर रत्नागिरी तालुक्याच्या ८ खेळाडूंनी यश मिळवले असून गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरी तालुक्याचा संघ रवाना झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुल, बालाघाट रोड, मरारटोली, गोंदिया येथे ३ ते ६ ऑक्टोबर या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. यात १४, १७ आणि १९ वर्षांखालील रत्नागिरीतील त्रिशा सचिन मयेकर, २६ किलो वजनी गट, कॉन्व्हेंट हायस्कूल तर ४६ किलो वजनी गटात अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची आदिती शिवगण हे दोन खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धकांना मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. त्रिशा व अदितीला प्रमुख महिला प्रशिक्षक आराध्या प्रशांत मकवाना प्रियांका चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष व्यंकटेश करार,सचिव लक्ष्मण के, कोषाध्यक्ष शंशाक घडशी तालुका अध्यक्ष राम के, सचिव शाहरूख शेख यांनी शुभेच्छा दिल्या.

IMG-20220514-WA0009LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here