खेड न. प. कडून इमारतीच्या बांधकामाचा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र गाडीची व्यवस्था

0

खेड : शहर स्वच्छता अभियानातंर्गत शहर कचरामुक्त करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी दिवस रात्र राबत असून इमारतीच्या बांधकामाचा कचरा गोळा करण्यासाठी नगर प्रशासनाने स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली आहे नागरिकांनीही नगर प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. एकीकडे कचरा प्रकल्पाअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावायची कुठे हा यक्षप्रश्न नगरप्रशासनास सतावत असला तरी शहरातून दिवसाकाठी जमा होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे तरीही कचरा प्रश्नावर मात करण्यासाठी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे उपनगराध्यक्ष सुनील दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनावर भर दिली जात आहे. शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नगरपरिषद सहभागी झाली असून शहराचे स्वच्छतेचे मानांकन वाढवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. घरातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण स्वतंत्र घंटागाड्याही उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय शहर कचरा मुक्त करण्यासाठी डस्टबिनचे वाटप ही करण्यात आले असून बचत गटानाही सहभागी करून घेतले आहे. शहरातील घरगुती स्तरावर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रक्रिया राबवली जात आहे. प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिकचे प्रमाण अंशतः घटले आहे. तर याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरु असल्याने ती आगामी काळात अधिक वेगाने सुरु राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लघन होणार नाही, याकडे लक्ष देऊन ओला व सुका कचरा वर्गीकरण करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.

HTML tutorial
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here