नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, जगतप्रकाश नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली. म. गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरद्वारे, मानवतेच्या प्रती म. गांधी यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि चांगल्या जगाची निर्मिती करण्यासाठी आपण कठोर परिश्रम करण्याचा संकल्प करूया. पंतप्रधामनांनी म.गांधींविषयी एक छोटा व्हीडीओदेखील प्रसारित केला. महात्मा गांधी यांचा शांतीसंदेश जागतिक समुदायासाठी आजही प्रासंगिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
