खासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळावर निवड

0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सभासद असलेल्या  खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यत्वासाठी निवड करण्यात आली आहे.  केडीसीएच्या (कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कार्यकारिणी मंडळाच्या सभेत आज (दि.2) एकमताने जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सन 2019 ते 2022 या त्रैवार्षीक निवडणुकीत कार्यकारिणी मंडळावर मा. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती निवड झाली आहे.  या निवडीसाठी एमसीएचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, केडीसीएचे माजी अध्यक्ष आर.ए. (बाळ) पाटणकर व माजी अध्यक्ष व सदस्य ऋतुराज इंगळे या सर्वाचे तसेच पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे यशवंत भुजबळ व पदाधिकारी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत मते व पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे राजन नार्इक व पदाधिकारी, रत्नागीरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे किरण सामंत व पदाधिकारी यांचे  बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या निवडी मुळे कोल्हापूर क्रिकेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सन 2019 ते 2022 कालावधीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विकास काकतकर, उपाध्यक्षपदी अजय गुप्ते, सेक्रेटरी पदी रियाज बागवान, खजानिसपदी सुरेंद्र भांडारकर, सेक्रेटरीपदी राहुल ढोले पाटील यांची निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून महाराष्ट्राचे माजी निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांनी काम पाहिले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here