बिग बींकडून ‘झुंड’ सिनेमाची तारीख जाहीर, नाना पटोलेंकडून आंदोलनाची घोषणा

0

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देऊन एक दिवस उलटत नाही, तोच बिग बींनी ‘झुंड’ चित्रपटाची तारीख जाहीर केली. त्यानंतर पटोलेंनी अमिताभ बच्चन यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेस लोकशाही पद्धतीने आधीपासूनच इंधन दरवाढीचा विरोध करत आलं आहे. जिथे अमिताभ बच्चन किंवा अक्षयकुमारच्या सिनेमाचं शूटींग सुरु असेल, तिथे काळे झेंडे दाखवणार, अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेस कार्यकर्ता काळे झेंडे दाखवेल. प्रत्येक सिनेमापूर्वी काँग्रेसचे कार्यकर्ते सिनेमा थिएटरबाहेर काळे झेंडे दाखवून विरोध करणार, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

झुंड कधी प्रदर्शित होणार?

मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक टीझर यापूर्वीच रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता लागली होती. अखेर बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वत: नागराज मंजुळेंच्या या सिनेमाची तारीख जाहीर केली. येत्या 18 जूनला झुंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:32 PM 20-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here