रत्नागिरीतील जेष्ठ वकीलाचे व्हाट्सऍप हॅक करून पाठवण्यात आले पॉर्न व्हिडीओ

0

🔳 नागरिकांनो सावधान…तुमच्याही बाबतीत असे घडू शकते!

➡ रत्नागिरी : सहजासहजी हॅक न होणारे म्हणून ओळख असणारे व्हाट्सऍप देखील आता हॅक होऊ लागले असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. रत्नागिरीतील जेष्ठ विधितज्ञ म्हणून ओळख असणारे ऍड. दिलीप भावे यांच्याबाबत एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेतून इतरांनी सावध व्हावे व सोशल मीडियाचा योग्य काळजी घेत वापर करावा असे आवाहन ऍड. दिलीप भावे यांनी केले आहे. तुमचे बीएसएनएल सिमकार्ड एक्सपायर होणार आहे असा मेसेज ऍड. भावे यांना एका मोबाईलवरून येताच त्यांनी त्या नंबरला कॉल केला मात्र समोरच्याने तो उचलला नाही. थोड्या वेळाने पुन्हा त्या नंबरवरून भावे यांना कॉल आला व सिमकार्ड बंद न पडण्याकरिता एक अँप डाउनलोड करावयास सांगितले. ऍड. भावे यांनी सदरचे अँप डाउनलोड केल्यावर समोरील व्यक्तीने नेटबँकिंगद्वारे 11 रुपये भरण्यास सांगितले. सदर प्रकार संशयास्पद वाटतात ऍड भावे यांनी मी ऑनलाईन पेमेंट न करता ऑफिसला येऊन पेमेंट करतो असे सांगितले व कॉल कट केला. यानंतर ऍड भावे यांनी आपले व्हाट्सऍप अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झाले नाही. त्यानंतर लगेचच ऍड भावे ज्या ज्या ग्रुपमध्ये होते, त्यातील ग्रुप मेंबरनी कॉल करून कळवले की तुमच्या नंबर वरून अश्लील फोटो व व्हिडीओ आले आहेत. तसेच डीपी बदलून त्या ठिकाणी अश्लील फोटो ठेवण्यात आला आहे. ऍड भावे यांनी याबाबत तात्काळ शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून याबत सायबर सेल अधिक तपास करीत आहे. सध्या अशा घटना अनेकांच्या बाबतीत घडल्याचे अनेकजण बोलत आहेत. याच पद्धतीने अनेकांची यापूर्वी आर्थिक फसवणूक देखील झाली आहे. मात्र अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे पोलिसांना सहज शक्य होत नसल्याने असे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
7:57 PM 20-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here