पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम; जनता संवादातील ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे

0

मुंबई : राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले असून त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाउन लागू करणार का?, या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. रविवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला आठ दिवसांची मुदत दिली आहे. राज्यात करोनाची स्थिती चिंताजनक बनली असून जर राज्यात लॉकडाउन नको असेल, तर लोकांनी मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या महत्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील, असे आवाहन करतानाच जर येत्या १० दिवसात लोकांनी मास्कचा वापर केला नाही, तर राज्यात पुन्हा लॉकडाउन घोषित करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात लॉकडाउन हवा की नको ते जनतेच्याच हातात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील करोनाच्या ताज्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. सुरुवातीच्या काळात आपण नियम पाळत होतो, मात्र मधल्या काळाच आपण ढिलाई दिली. मास्क, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी विसरलो असे सांगत आता काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील असे मुख्यमंत्री म्हणाले तुम्हाला राज्यात लॉकडाउन हवा की नको, असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला विचारला. जर लॉकडाउन नको असेल तर जनतेला काळजी घ्यावीच लागेल, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याची कळकळीची विनंती जनतेला केली. ज्यांना लॉकडाउन नको आहे ते मास्क घालून फिरतील, हात धुतील आणि सामाजिक अंतर पाळतील, आणि ज्यांना लॉकडाउन हवा आहे ते मास्क घालणार नाहीत, हात धुणार नाहीत आणि सामाजिक अंतर पाळणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मास्क घालणे हे अनिवार्य असून मास्क घालणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाषणातील महत्वाचे मुद्दे
◼️ सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलं, तर कारवाई करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
◼️ आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी घरचा विवाह सोहळा रद्द केला. याला म्हणतात खरी सामाजिक जाणीव. जनतेच्या वतीनं तुमच्या मुलाला आशीर्वाद : उद्धव ठाकरे
◼️ संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय : उद्धव ठाकरे
◼️ कोविडयोद्धा होता नाही आलं तर कोविड दूत तरी होऊ नका. अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेत. ज्यावेळेस ◼️ कोरोना टोकावर होता तेव्हाही अशी स्थिती नव्हती : उद्धव ठाकरे
◼️ शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल – उद्धव ठाकरे
◼️ कोरोना महाराष्ट्रात येऊन आता वर्ष पूर्ण होईल. ती जी परिस्थिती होती ती भयानक होती. पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण होईल. ह्या सर्व काळात समाधानाचा क्षण कोणता? तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला सदस्य मानलं हा समाधानाचा क्षण. हे असं असायला भाग्य लागतं. ते दिवस खूप भयानक होतं – उद्धव ठाकरे
◼️ लसीकरण कधी तर उपरवाले की मेहरबानी. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील. तोपर्यंत काय काय करायचं. शिवरायांना वंदन करणं हे पवित्र काम काम : उद्धव ठाकरे
◼️ यात्रा, सभा, मिरवणुका यांना सोमवारपासून राज्यात बंदी
◼️ जर सगळ्या गोष्टी पाळण्यात आल्या नाहीत तर कडक लॉकडाऊन करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांचा इशारा
◼️ ‘माझे कुटुंब माझे मोहिम’ याप्रमाणे आपण ‘मी जबाबदार’ ही नविन मोहिम राबवायला हवी आहे.
◼️ सोमवार रात्रीपासून जिथं वाटतं तिथं बंधनं घाला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
◼️ लॉकडाऊन करायचा की नाही या प्रश्नाचं उत्तर येत्या ८ दिवसांत नागरिकांकडूनचं मिळेल, उद्धव ठाकरेंचा थेट जनतेच्या कोर्टात चेंडू. ल़ॉकडाऊन नको असेल तर मास्क वापरा,हात धुवा आणि सुरक्षित अंतर राखा.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 22-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here