मुंबई : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील घरात चोरीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून एकाला अटक केली आहे. अटक केलेली व्यक्ती त्यांच्याच घरी काम करत होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संशयिताकडून अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे संशयिताकडून मोबाईल जप्त केला आहे. त्यात रेल्वे आणि अर्थ मंत्रालयाशी संबंधित महत्त्वाची माहिती सापडली आहे. तसेच त्याने अन्य काही जणांच्या इमेलवर ही माहिती पाठवल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती अन्य काही व्यक्तींपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवत असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
