राजापूरमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त

0

राजापूर : शहरातील खडपेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीची सुमारे १६ हजार रुपयांची दारू एका घरातून जप्त केली. याप्रकरणी अक्षय अरविंद खटावकर या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर, खडपेवाडी येथे गोवा बनावटीची दारू बेकायदा विकली जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहिती आधारे उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली लांजाचे निरीक्षक विक्रम मोरे, भरारी पथकाचे उपनिरीक्षक किरण पाटील, जवान निनाद सुर्वे, विशाल विचारे, मिलिंद माळी, सागर पवार यांच्या पथकाने शनिवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छापा मारला. या छाप्यात मॅकडोल्ड नंबर १, इम्पेरियल ब्लू व्हिस्की व अन्य साठा जप्त केला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 22-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here