आजपासून विश्व महिला अजिंक्यपद स्पर्धा

0

उलान उदे : सहावेळची जागतिक विजेती मेरी कोम आपल्या अनुभवाच्या जोरावर उद्यापासून (गुरुवार) येथे सुरू होत असलेल्या विश्व महिला मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पदकाची दावेदार असेल. तसेच, या स्पर्धेतील सहभागी भारतीय युवा मुष्टियोद्ध्यांकडूनही पदकांची आशा असेल. मणिपूरची 36 वर्षांच्या मेरी कोमची कारकीर्द आजअखेर शानदार राहिली आहे. परंतु, 51 कि. ग्रॅ. वजनी गटाचे विश्वविजेतेपद आपल्या नावे करण्यात अद्याप तिला यश आलेले नाही. म्हणूनच ती रशियामधील या शहरात विजेतेपद आपल्या झोळीत टाकण्यासाठी आतूर झाली आहे. मेरी कोमने 51 कि. ग्रॅ. वजनगटात मोठी रस्सीखेच असूनही ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. माजी विजेती एल. सरितादेवी (60 कि. ग्रॅ.) वर अनेकांच्या नजरा असतील. तिने सराव स्पर्धेत शानदार प्रदर्शन करीत गतवेळची कांस्यपदक विजेती आणि आपल्यापेक्षा अधिक युवा असणार्‍या सिमरनजित कौरला पराभूत केले. आशियाई स्पर्धेमधील ती तब्बल आठवेळची विजेती तसेच आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा महासंघाच्या (एआयबीए) पहिल्या अ‍ॅथलिट आयोगाची सदस्य बनण्याच्या शर्यतीमध्येही आघाडीवर आहे. त्यासाठी या प्रतिष्ठित स्पर्धेदरम्यान मतदान होणार आहे. आयोगामध्ये सदस्याच्या रूपाने विराजमान होण्याची तिला पूर्ण खात्री आहे. कारण, आशियातून आणखी कोणाचेही त्यासाठी नामांकन नाही. ‘इंडिया ओपन’चा सुवर्णपदक विजेता नीरज (57 कि. ग्रॅ.) आणि जमुना बोरो (54 कि. ग्रॅ.) ही अशा पाच मुष्टियोद्ध्यांपैकी एक आहे की, जी या स्पर्धेमध्ये पदार्पण करेल आणि खळबळजनक निकाल लावण्याची तिच्यात क्षमता आहे. त्याशिवाय 75 कि. ग्रॅ. वजनगटात आशियाई विजेती स्विटी बुरावर नजरा असतील. तिने सन 2014 मध्ये या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रीय प्रशिक्षक मोहम्मद अली कमार यांनी सांगितले की, संघामध्ये चांगले मिश्रण आहे. गतवेळी आम्ही चार पदके पटकावली होती. आता फक्त या स्पर्धेत पदार्पण करणारे खेळाडू यावेळच्या आव्हानाला कशी टक्कर देतात याकडेच लक्ष आहे. ते म्हणाले की, ‘येथे येण्यापूर्वी इटलीमध्ये झालेले सराव शिबिर भारतीय खेळाडूंसाठी चांगले राहिले. याठिकाणी आमच्या खेळाडूंना चिनी मुष्टियोद्ध्याबरोबर सराव करण्याची संधी मिळाली.’ चीनचे खेळाडू आपल्या देशाबाहेर अतिशय कमी जातात आणि या स्पर्धेतील त्या मोठ्या दावेदार आहेत. मेरी कोमच्या आवडत्या 48 कि. ग्रॅ. वजनगटात यावेळी मंजू राणी आपले आव्हान देईल. कमार म्हणाले की, ‘तिने आपली क्षमता दाखवली आहे आणि मला विश्वास आहे की, ती पदक पटकावण्यात यशस्वी होईल.’ भारताने या स्पर्धेत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 2006 मध्ये केले होते. या स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणे सांभाळत मेरी कोम आणि सरिता यांच्या सुवर्णपदकांसह आठ पदके पटकावली होती. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here