पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन अतिशय घाणेरडं राजकारण; संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

0

यवतमाळ : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी समोर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी. या प्रकरणात घाणेरडं राजकारण केलं जात आहे. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं संजय राठोड म्हणाले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:36 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here