“गोवर्धन पर्वत वाचवा, अन्यथा उद्या मोदी तोसुद्धा विकून टाकतील”

0

मथुरा : कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून आता राजकारण अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी महापंचायतींचे आयोजन केले जात आहे. आज मथुरेतील पालीखेडा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या अशाच एका महापंचायतीला प्रियंका गांधी यांनी संबोधित केले. तसेच यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली.

मोदींवर जोरदार टीका करताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख अहंकारी आणि भेकड असा केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आधीच्या सरकारांनी जर काहीच केलं नाही तर मोदी विकत काय आहेत. तुमच्या सरकारने केवळ नोटाबंदी आणि जीएसटी तयार केला. त्यामुळे जनता त्रस्त आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच जोपर्यंत तीन कृषी कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील. तसेच आमचे सरकार येताच हे कायदे रद्द केले जातील, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले. प्रियंका गांधी यांनी म्हणाल्या की, मोदी सरकारने एलआयसीशिवाय अनेक अन्य कंपन्या विक्रीस काढत आहे. आता तुम्ही गोवर्धन पर्वत वाचवा, नाहीतर मोदी सरकारा उद्या तोसुद्धा विकून टाकेल. मोदींचे शेतकऱ्यांसोबत नेमके कोणते वैर आहे ते कळत नाही. मोदी संसदेत शेतकऱ्यांचा अवमान करतात. त्याचे मंत्री शेतकऱ्यांना दहशतवादी बोलतात. जेव्हा संसदेत राहुल गांधींनी संसदेत मौन पाळले तेव्हा सरकारने त्यामध्ये सहभाग घेतला नाही. मथुरेची ही भूमी अहंकार मोडून काढते. भाजपा सरकारनेसुद्धा अन्नदात्याविरोधात अहंकार बाळगला आहे. ९० दिसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपली लढाई लढत आहेत. २०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या काळात मोदी जगभरात सगळीकडे पोहोचले. मात्र त्यांना या शेतकऱ्यांची भेट घेता आली नाही, असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, या सरकारचा विवेक मेला आहे. भगवान श्रीकृष्ण यांचासुद्धा अहंकार तोडणार आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी आपल्यासाठी दोन विमाने खरेदी केली. मात्र शेतकऱ्यांची थकीत रक्कम दिली नाही. या सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेलचे दरही वाढत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here