संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला भीक घातली नाही : मुनगंटीवार

0

मुंबई : भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या आजच्या शक्तिप्रदर्शनावर भाष्य केलं आहे. मुनगंटीवार म्हणाले की ‘वनमंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या होत्या. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. असही मुनगंटीवार पुढे म्हणाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 23-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here