गोंदे दुमाला येथील युवकाने मलेशियात भारताचा तिरंगा फडकवला

0

मुकणे (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील वेदांत जाधवने मलेशिया येथे पार पडलेल्या ‘ स्पार्टन रेस या धावण्याच्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करुन भारताचा तिरंगा मलेशियात फडकावला. या स्पर्धेत वेदांतने वयाच्या १४ व्या वर्षी कांस्यपदकाला गवसणी घातली.  या कामगिरीमुळे देशासह आपल्या गावाचे नाव मोठ्या अभिमानाने झळकवत वेदांतने नाशिक जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. मलेशियात २० तारखेला स्पार्टन रेस या क्रीडा प्रकारात त्याने भारताचे नेतृत्व केले असून २० प्रकारचे अडथळे पार करताना ५ किलोमीटर अंतरात उंच डोंगर पार करणे, उंच भिंत, दोर चढणे, तारेखालून फरफटने, नदी पार करणे, ३०किलो वजनासह ३०० मीटर धावणे, असा खडतर अडथळा पार करताना सुरेख कामगिरी करत वेदांतने विजयश्री खेचून आणली. वेदांत हा नाशिक येथील विजडम हायस्कूल गंगापूर रोड या शाळेत शिकत आहे. त्यास चैतन्य भोसले या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्यातील नामवंत संस्था तसेच मान्यवरांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षांत केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here