बहादूरशेख नाका येथील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातून केबलची चोरी

0

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातून ५० हजार रुपये किमतीची ४८० मीटर केबल कनेक्टरची चोरी झाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित पाटेखेडे यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दिली आहे. यानुसार दि.७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान २०२१ ही घटना घडली. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 24-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here