रत्नागिरीच्या दोन सुकन्या भारतीय पॉवरलिफ्टिंग संघात

0

रत्नागिरी : केरळ राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच इडुक्की केरळ येथे झाली. या स्पर्धेमध्ये रत्नागिरीची धनश्रीमहाडिक व प्रतीक्षासाळवी यांनी महाराष्ट्र संघातून चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवले. या स्पर्धेत धनश्री महाडिक हिने सबज्युनिअर ५७ किलो वजनीगटात एकूण २४२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. प्रतीक्षा साळवी हिने ज्युनिअर ८४ वरील वजनी गटात ३८५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. प्रतीक्षा हिने ज्युनिअर गटात स्ट्राँग वूमन हा किताब पटकावला. याच स्पर्धेत कलिका नागवेकर हिने सबज्युनिअर ८४ किलो वजनी गटात एकूण २२२.५ किलो वजन उचलून पाचवा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक राज नेवरेकर, रत्नागिरी जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन अध्यक्ष मदन भास्करे, सदानंद जोशी, निशीला महाडिक, नीता चाफळे, शैलेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे खेळाडू अभ्युदय नगर व्यायामशाळा येथील खेळाडू आहेत. या स्पर्धेमध्ये मास्टर, ज्युनिअर, सबज्युनिअर गटामध्ये संपूर्ण भारतातून १२०० स्पर्धक सहभागी झाले होते. धनश्री महाडिक व प्रतीक्षा साळवी यांची निवड कझाकिस्तान येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या इंटर नॅशनल क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धे साठी झाली आहे. महाराष्ट्रातून ३५ खेळाडू व पूर्ण भारतातून २०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here