अंजनी स्टेशनवर नवीन लूप लाईन

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे तर्फे बुधवारी अंजनी स्टेशनवर नवीन लूप लाईन कार्यान्वित करण्यात आली. फेब्रुवारी २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आलेली ही कोकण रेल्वेवरची पाचवी नवीन लूप लाईन आहे. यापूर्वीच्या चार लूप लाइन्स या सावर्डे, राजापूर, मुर्डेश्वर आणि वैभववाडी या स्टेशन्सवर कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या नवीन लुप लाईनच्या कार्यान्वयनामुळे कोकण रेल्वेला वाहतूक हाताळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले. ही लाईन कार्यान्वयित करण्यासाठी काळ संध्याकाळी सहा वाजता काम चालू करण्यात आले होते. त्यानंतर मार्गावरील पहिली गाडी, जनशताब्दी एक्सप्रेस, रात्री साडेनऊ वाजता अंजनी स्टेशनमधून रवाना झाली, तर २ ऑक्टोबर रोजी ही लूप लाईन पूर्णत्वाने कार्यान्वित करण्यात आली. यासाठी कर्मचारी, त्यांचे पर्यवेक्षक व त्यांचे अधिकारी अशा एकूण २०० लोकांचा सहभाग होता. या लूप लाईनच्या बांधकाम करता एकूण २.२५ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. आता रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AMLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here