रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अधिकारी/कर्मचारी यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती

0

◼️ दिगंबर शिंदे, सुधाकर कोकितकर, दिगंबर मोरे यांचा स्वेच्छानिवृत्तीपर सभापतींच्या हस्ते सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाकडून प्र. सचिव/लेखापाल श्री.दिगंबर शिंदे तसेच श्री. सुधाकर सदाशिव कोकितकर -निरीक्षक व श्री. दिगंबर गणपत मोरे -वाहनचालक अशा तिघांनी दि.31डिसेंबर -2020 रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली. बाजार समितीच्या संचालक मंडळाची दि.24 फेब्रुवारी रोजी मासिक सभा पार पडली. या सभेपूर्वी तिघांचाही कार्यालयामार्फत सकाळी 11-00 वाजता निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती संजय आयरे, उपसभापती अनिल जोशी, माजी सभापती व सध्याचे संचालक गजानन पाटील, मधुकर दळवी, दत्तात्रेय ढवळे, माजी उपसभापती व सध्याचे संचालक शौकत माखजनकर तसेच संचालक हेमचंद्र माने, माधव सप्रे, प्रकाश जाधव, विठाबाई कदम, मेधा कदम, दीप्ती निखार्गे, संजय नवाथे, कौस्तुभ केळकर, संदीप सुर्वे, यांच्यासह प्र. सचिव प्रमोद मोहिते,कर्मचारी रोहित सुर्वे, मंदार सनगरे, तसेच इतर कर्मचारी आणि मान्यवर आवर्जून उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना स्वेच्छानिवृत्ती घेतलेले निवृत्त प्र. सचिव/लेखापाल दिगंबर शिंदे यांनी बाजार समिती सेवेतील अनुभवलेल्या कामकाजाबाबत मनोगत सांगताना दरम्यानच्या काळातील संचालक मंडळ आणि सर्व सहकारी यांनी केलेल्या सहकार्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कामे करताना सन्मानीय ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले. प्राप्त परिस्थितीत बाजार समितीच्या दृष्टीने कायद्यात होत असलेले बदल आणि त्यामुळे बाजार समितीवर आलेल्या आर्थिक अडचणीं याचा विचार करून बाजार समिती व पणन संचालनालय यांच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या योजनेला प्रतिसाद देऊन आपण स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच सध्या चाललेल्या कृषी विषयक घडामोडी, शेतकऱ्यांचे आंदोलन तसेच कृषी बाजार समिती विषयक शासनाची भूमिका याचा विचार करता बाजार समितीला भविष्यात सकारात्मक वातावरण दिसून येत असल्याचे सांगितले. यावेळी माजी सभापती मधुकर दळवी यांनी सांगितले की,  तुम्ही चांगल्या प्रकारे काम केले आहे. उत्तम केलेत. आता काळ बदलला आहे. बाजार समितीची आर्थिक परिस्थिती चांगली झाली की, तुम्हाला तुमचं राहिलेले सर्वकाही देणं मिळेल. निवृत्त कर्मचारी वर्गाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सत्कार कार्यक्रमाची सांगता झाली

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:18 AM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here