राजरत्न प्रतिष्ठानचा मनोरुग्णाला आधार

0

रत्नागिरी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शहरात फिरणाऱ्या मनोरुग्णाचा कायापालट करून त्यांना प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. प्रतिष्ठानतर्फे आतापर्यंत ३४ मनोरुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील काही रूग्ण बरेही झाले आहेत. मागील काही महिने शहरातील साळवी स्टॉप ते जयस्तंभ या रस्त्यावर एकमनोरूग्ण फिरत होता. याचीमाहिती राजरत्न प्रतिष्ठानच्या सदस्यांना मिळताच त्यांनी या मनोरुग्णाला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या अंगावर अत्यंत मळकट अवस्थेतील कपडे होते. या सदस्यांनी त्याला आंघोळ घातली. केस व वाढलेली दाढी कापली. नवे कपडे घालत त्याचा कायापालट केला. त्याला नास्ता देऊन प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखलही केले. न्यायालयात यासाठी त्यांनी त्याचे रितसर पालकत्वही स्वीकारले आहे. या रुग्णाला उपचार मिळवून देण्यासाठी राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे, रुपेश सावंत, भूषण बर्वे, संजय सावंत, आकाश शिंदे आणि सिद्धेश धुळप यांचे सहकार्य लाभले.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here