वडेरू गावात घुमला आर्थिक सक्षमीकरणाचा जागर

0

चिपळूण : आर्थिक सक्षमीकरणातून समृद्ध ग्राम साकारता येणे शक्य आहे. त्याकरिता कोणते उद्योग-व्यवसाय निवडावेत, याचे प्रशिक्षणासह व्यवस्थापन, उत्पादनपश्चात विक्री व्यवस्था अशा साऱ्यासह कृती कार्यक्रमांच्या नियोजनातून वडेरू गावात महिला सक्षमीकरणाचा जागर घुमला. चिपळूणमधील दिशान्तर संस्था आणि वडेरू येथील स्व. मोने गुरुजी सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक सक्षमीकरण आणि कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील १२ बचत गटांना दोन सत्रांत विभागणी करून कार्यशाळा पद्धतीने हे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला नवनिर्वाचित सरपंच जान्हवी कदम, उपसरपंच प्रवीण खांडेकर, महेंद्र कदम, रवींद्र बोंडकर, सुजाता कदम, मेघा कदम हे ग्रामपंचायत सदस्य तसेच सुनीता कदम उपस्थित होत्या. पाहुण्यांचे स्वागत स्व. मोने गुरुजी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक मोने, सचिव सूरज शिंदे, सहसचिव सिद्धेश कदम, खजिनदार संदीप वनगे, संदीप कदम, कार्याध्यक्ष नितीन कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर सावंत, सुभाष सावंत यांनी अल्पोपाहार, निवास आणि इतर सहकार्य केले. अर्थ सक्षमीकरणाच्या दोन टप्प्यांतील या कार्यशाळेसाठी श्री साई, सखी, रमाई, पंचशील, मंगलमूर्ती, सद्गुरू कृपा, नवसंजीवनी, सालबाई, जय हनुमान, महालक्ष्मी, भक्ती आणि चंडिका या महिला बचत गटांमधील सदस्य-पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here