चीन गरिबीमुक्त झाल्याची घोषणा

0

आपण गरिबीपासून पूर्णत: मुक्तता प्राप्त केली असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली. त्यांनी दावा केला आहे की चीनला गरिबीमुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून जी मुदत देण्यात आली होती, त्याच्या 10 वर्ष आधीच त्यांनी हे उद्दीष्ट गाठलं आहे. जिनपिंग यांनी दावा केला आहे की 2012 नंतर त्यांनी प्रत्येक वर्षाला किमान 1 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. चीनची लोकसंख्या ही 140 कोटी असून 40 वर्षात 77 कोटींपेक्षा अधिक नागरीक गरिबीतून बाहेर आले असल्याचं जिनपिंग यांनी म्हटलं आहे. जिपनिंग यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणून ठेवलं आहे. चीनने गरिबी हटावचा 1970 साली नारा दिला होता. गेल्या आठ वर्षात लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी 246 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. 8 वर्षांपूर्वी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते. दहा वर्षातील कामांचा आढावा मांडत असताना त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेत लोकांना गरिबीतून वर आणल्याचा दावा केला. त्यांना म्हटलं आहे की 10 कोटी चिनी जनता गरिबीमुक्त झाली असून 2.5 कोटी लोकांना झोपडीऐवजी पक्की घरे मिळाली आहेत. आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबीमुळे 1800 लोकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here