रत्नागिरी : ५२ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवात नाट्य, नृत्य, संगीत, ललित कलाप्रकारात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने यश मिळवले. अंतिम फेरीसाठी प्राप्त झालेल्या कला प्रकारांपैकी ११ कला प्रकारांमध्ये २५ विद्यार्थ्यांनी पदके संपादन केली आहेत. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील सहा विद्यार्थ्यांना सुवर्ण, तीन विद्यार्थ्यांना रौप्य, सोळा विद्यार्थ्यांना कांस्य पदके तर आठ विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली आहेत. मराठी स्कीट ६ सुवर्ण, रांगोळीमध्ये ओंकार कांबळे – रौप्य, मराठी एकपात्री – सागर पाटणकर – रौप्य, उत्कृष्ट मराठी एकांकिका – अभिनेत्री साक्षी कोतवडेकर-रौप्य, मराठी एकांकिका नऊ पदके, हिंदी स्कीट सहा विद्यार्थी-सहा कांस्य पदके, सुगम गीत गायन-वैष्णवी जोशी- एक कांस्य पदक तर उत्तेजनार्थ नाट्य गीत गायन करिता सायली मुळ्ये, मराठी एकांकिका अभिनेता शुभम गोविलकर, हिंदी एकांकिका अभिनेता अजिंक्य केसरकर, ललित कलेमध्ये चार विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ अशी पारितोषिके प्राप्त झाली. निलेश गोपनारायण, मयूर साळवी, मयूर भाटकर, ओंकार बंडबे, हेमंत कांचन या माजी विद्यार्थ्यांनी तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. आनंद आंबेकर, प्रा. शुभम पांचाळ, प्रा. आरती पोटफोडे,प्रा. सायली पिलणकर, प्रा. प्रशांत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसाद गवाणकर, महेश सरदेसाई यांनी सहकार्य केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
