राष्ट्रवादीला मोठा धक्का! कुडाळमधील १०० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0

सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कुडाळ मालवण बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सचिन तेंडुलकर आणि संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घड्याळ सोडून कमळ हाती धरले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:50 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here